Gajanan maharaj adhyay 13

॥ श्रीगणेशाय नमः ॥

हे संतवरदा श्रीधरा । हे दयेच्या सागरा ।हे गोपगोपीप्रियकरा । तमालनीळा पाव हरी ॥१॥

तुझें ईशत्व पाहण्याकरितां । जेव्हां झाला विधाता ।गाई-वासरें चोरितां । यमुनातटीं गोकुळांत ॥२॥

तेव्हां तूं निजलीलेंकरुन । गाई वासरें होऊन ।ब्रह्मदेवाकारण । आपलें ईशत्व दाविलें ॥३॥

दुष्ट ऐशा कालियाला । यमुनेमाजीं तुडवून भला ।रमणकद्वीपा धाडिला । गोप निर्भय करण्यास ॥४॥

तेवीं माझ्या दुर्दैवा । तुडवूनी या वासुदेवा ।दासगणू हा करावा । निर्भय सर्व बाजूंनीं ॥५॥

मी अजाणभक्त तुझा हरी । परी देवा कृपा करी ।मी आहे अनाधिकारी । योग्य न तुझ्या कृपेस ॥६॥

ऐसें जरी आहे सत्य । परी नको पाहूंस अंत ।माझी चिंता वार त्वरित । आपुल्या कृपाकटाक्षें ॥७॥

आतां श्रोते सावधान । बंकट, हरी, लक्ष्मण ।विठू जगदेवादि मिळून । गेले वर्गणी जमवावया ॥८॥

भाविकांनीं वर्गणी दिली । कुत्सितांनीं कुटाळी केली ।वर्गणीची कांहो पडली । जरुर तुमच्या साधूस्तव ॥९॥