Gajanan vijay granth adhyay 4

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा । नीलकंठा गंगाधरा ।महाकाल त्र्यबंकेश्वरा । श्रीओंकारा पाव मशी ॥१॥ तूं आणि रुक्मिणीशा । एक तत्त्व आहां खास ।तोय वारी म्हटल्यास । काय जलीं भेद होतो ? ॥२॥ तैसी तुमची आहे स्थिती । तंतोतंत जगत्पति ।जैसी ज्याची मानेल मति । तैसा तो तुज बाहत ॥३॥

अनन्यभावें बाहतां । तूं पावसी आपुल्या भक्तां ।माता न धरी निष्ठुरता । आपल्या वत्साविषयीं कधीं ॥४॥ मी तुझें अजाण लेंकरुं । नको माया पाताळ करुं ।तूं साक्षात् कल्पतरु । इच्छा पूर्ण करी हरा ॥५॥ बंकटलालाचे घरांत । असतां स्वामी समर्थ ।प्रकार एक अघटीत । आला ऐसा घडोनी ॥६॥ वैशाख शुद्ध पक्षासी । अक्षयतृतीयेचिया दिवशीं ।पितरार्थ उदककुंभासी । देती श्राद्ध करोनिया ॥७॥ अक्षयतृतीयेचा दिवस । वर्‍हाडांतील लोकांस ।विशेष वाटे प्रत्येकास । मोठा सण मानिती हा ॥८॥ त्या दिवशीं काय झालें । तें पाहिजे श्रवण केलें ।महाराज पोरांत बैसले । कौतुकें लीला करावया ॥९॥ बालकां म्हणती गजानन । चिलीम द्यावी भरुन ।तंबाखूची मजकारण । विस्तव वरी ठेवोनिया ॥१०॥ सकाळपून ऐसाच बसलों । चिलीम मुळीं नाहीं प्यालों ।त्यामुळें हैराण झालों । भरा चिलीम मुलांनो ! ॥११॥ ऐसी आज्ञा ऐकतां भली । पोरें अवघीं आनंदलीं ।चिलीम भरुं लागलीं । तंबाखू आंत घालुनिया ॥१२॥ विस्तवाचा तपास केला । तो न सदनीं मिळाला ।कां कीं चूल पेटण्याला । अवकाश होता विबुध हो ॥१३॥ पोरें चित्तीं विचार करिती । आपापसांत निश्चिती ।कशी करावी यासी युक्ति । विस्तव पाहिजे चिलिमीला ॥१४॥ मुलें पाहून चिंतातुर । बंकट करी मधुरोत्तर ।अरे जानकीराम सोनार । आहे वेटाळीं * आपुल्या ॥१५॥ त्याच्याकडे तुम्ही जावें । विस्तवासी मागून घ्यावें ।दुकान तें चालण्या बरवें । विस्तव लागतो आधीं त्या ॥१६॥ आधीं पेटते बागेसरी । त्याच्यापुढें दुकानदारी ।ही सोनाराची रीत खरी । आहे ठावें कीं तुम्हांला ॥१७॥ पोरांनीं तें ऐकिलें । जानकीरामाकडे आले ।विस्तव मागूं लागले । समर्थांच्या चिलमीस ॥१८॥ जानकीराम रागावला । लेंकरासी बोलता झाला ।अक्षयतृतियेच्या सणाला । दे न कोणा विस्तव मी ॥१९॥ पोरें म्हणालीं त्यावर । जोडोनी आपले दोन्ही कर ।नको करुं हा अविचार । विस्तव पाहिजे समर्थाला ॥२०॥ महाराज श्रीगजानन । देवाचेही देव जाण ।त्यांच्या चिलमीकारण । विस्तव हा जातसे ॥२१॥ साधुप्रती कांहीं देतां । तेथें अशुभाचि नसे वार्ता ।उगीच व्यावहारिक कथा । सांगत आम्हां बसूं नको ॥२२॥ आम्ही आहों मुलें लहान । तूं मोठा आमच्याहून ।ऐसें साच असून । हें न कैसें कळे तुला ? ॥२३॥ विस्तव तूं देशील जरी । भाग्य येईल तुझ्या घरीं ।चिलीम पिऊन तृप्त जरी । झाला गजानन महाराज ॥२४॥ तें सोनारें न ऐकिलें । अद्वातद्वा भाषण केलें ।ज्याचें जवळ मरण आलें । त्याचे पाय खोलाकडे ॥२५॥ सोनार म्हणे बालकांसी । गजानन कशाचा पुण्यराशी ? ।त्या चिलमीबहाद्दरासी । साधु म्हणून सांगूं नका ! ॥२६॥ 

गांजा तमाखू पीत बसतो । नग्न गांवांत हिंडतो ।वेडयापरी चाळे करितो । पितो पाणी गटाराचें ॥२७॥ जात गोत नाहीं त्याला । ऐशा वेडयापिशाला ।मी साधु मानण्याला । नाहीं मुळीं तयार ॥२८॥ बंकटलाल खुळावला । नादीं त्याच्या लागला ।नाहीं देत विस्तवाला । मी तयाचे चिलमीसी ॥२९॥ तो आहे ना साक्षात्कारी । मग विस्तव कशाला पाहिजे तरी ? ।आपुल्या कर्तृत्वें कां न करी । विस्तवातें निर्माण ? ॥३०॥ साधु नाथ जालंदर । पीत होते चिलीम फार ।परी विस्तवासाठीं घरघर । ना हिंडले कदा ते ॥३१॥ जा जा उभे न राहा येथ । विस्तव ना मिळे तुम्हांप्रत ।नाहीं मला किंमत । त्या तुमच्या पिशाची ॥३२॥ पोरें विन्मुख परत आलीं । महाराजांसी निवेदिली ।हकीकत जी कां झाली । सोनाराचे दुकानांत ॥३३॥ ती ऐकतां हास्यवदन । करिते झाले दयाघन ।नाहीं आपणां प्रयोजन । मुळींच त्याच्या विस्तवाचें ॥३४॥ ऐसें म्हणोन घेते झाले । चिलीम आपुल्या हातीं भले ।बंकटलालासी बोलले । काडी एक वरती धरी ॥३५॥ बंकट म्हणे गुरुराया । थोडें थांबा परम सदया ।विस्तव देतों करुनिया । काडी घासून आतां मी ॥३६॥ काडी घासल्यावांचूनी । कदां न प्रगटे अग्नि ।म्हणून केली विनवणी । ती मनास आणा समर्था ॥३७॥ महाराज बोलले त्यावर । उगी न करी चरचर ।नुसती काडी धरणें वर । तिला मुळींच घासूं नको ॥३८॥ बंकटलालें तैसें केलें । नुसत्या एका काडीस धरिलें ।चिलमीचिया वरती भले । समर्थ-आज्ञा म्हणून ॥३९॥ तों काय झाला प्रकार । ऐका तुम्ही श्रोते चतुर ।प्रगट झाला वैश्वानर । काडी नुसती धरतां वरी ॥४०॥ काडीप्रती विस्तवाचा । अंशही नव्हता साचा ।हा प्रभाव शक्तीचा । महाराजांच्या लोकोत्तर ॥४१॥ काडी तैसीच राहिली । चिलीम तीही पेटली ।कशाचीही नाहीं उरली । जरुर खर्‍या साधूला ॥४२॥ याचें नांव साधुत्व । उगीच नव्हतें थोतांड मत ।आतां सोनाराचे घरांत । काय झालें तें ऐका ॥४३॥ या अक्षयतृतियेला । मान विशेष चिंचवण्याला ।जेवीं वर्षप्रतिपदेला । महत्त्व निंब फुलांचें ॥४४॥ असो भोजना बैसली पंगत । चिंचवणें वाढलें द्रोणांत ।तों प्रकार ऐसा अघटीत । घडून आला तो ऐका ॥४५॥ त्या चिंचवण्यामाझारीं । अळ्या दिसल्या नानापरी ।बुजबुजाट झाला भारी । किळस वाटली सर्वांला ॥४६॥ लोक उठले पात्रांवरुन । अवघ्या अन्नातें टाकून ।सोनार बसला अधोवदन । कारण कांहीं उमजेना ॥४७॥ चिंचवण्याच्या संगें भलें । अवघें अन्न वायां गेलें ।मग त्या कोडें उमगलें । ऐसें व्हाया मीच कारण ॥४८॥

बंकटलालें तैसें केलें । नुसत्या एका काडीस धरिलें ।चिलमीचिया वरती भले । समर्थ-आज्ञा म्हणून ॥३९॥ तों काय झाला प्रकार । ऐका तुम्ही श्रोते चतुर ।प्रगट झाला वैश्वानर । काडी नुसती धरतां वरी ॥४०॥ काडीप्रती विस्तवाचा । अंशही नव्हता साचा ।हा प्रभाव शक्तीचा । महाराजांच्या लोकोत्तर ॥४१॥ काडी तैसीच राहिली । चिलीम तीही पेटली ।कशाचीही नाहीं उरली । जरुर खर्‍या साधूला ॥४२॥ याचें नांव साधुत्व । उगीच नव्हतें थोतांड मत ।आतां सोनाराचे घरांत । काय झालें तें ऐका ॥४३॥ या अक्षयतृतियेला । मान विशेष चिंचवण्याला ।जेवीं वर्षप्रतिपदेला । महत्त्व निंब फुलांचें ॥४४॥ असो भोजना बैसली पंगत । चिंचवणें वाढलें द्रोणांत ।तों प्रकार ऐसा अघटीत । घडून आला तो ऐका ॥४५॥ त्या चिंचवण्यामाझारीं । अळ्या दिसल्या नानापरी ।बुजबुजाट झाला भारी । किळस वाटली सर्वांला ॥४६॥ लोक उठले पात्रांवरुन । अवघ्या अन्नातें टाकून ।सोनार बसला अधोवदन । कारण कांहीं उमजेना ॥४७॥ चिंचवण्याच्या संगें भलें । अवघें अन्न वायां गेलें ।मग त्या कोडें उमगलें । ऐसें व्हाया मीच कारण ॥४८॥ मी न साधूंसी विस्तव दिला । त्याचा प्रत्यय तात्काळ आला ।गजाननाची अगाध लीला । मीं न खचित जाणिली ॥४९॥ गजानन जान्हवी नीर । मीं त्या मानिलें थिल्लर ।गजानन राजराजेश्वर । मीं त्या भिकारी मानिलें ॥५०॥ त्रिकालज्ञ गजानन । मीं त्या मानिलें वेडा पूर्ण ।कल्पतरुकारण । मीं बाभळ मानिली ॥५१॥ गजानन हा चिंतामणी । मीं लेखिली गार जाणी ।गजानन हा कैवल्यदानी । मी ढोंगी मानिला हो ॥५२॥ हाय हाय रे दुर्दैवा । त्वां कैसा साधिला दावा ।माझ्या हातून संतसेवा । होवो ना तूं दिलीस ॥५३॥ मसी असो हा धिक्कार । मी भारभूत साचार ।जन्म पावलों भूमीवर । द्वय पायांचा पशु मी ॥५४॥ आज माझ्या भाग्यकाळीं । बुद्धि कशी चळती झालि ।सुयोगाचि दवडिली । वेळ आलेली म्यां करें ॥५५॥ कांहीं असो आतां जाऊं । समर्थांचे पाय पाहूं ।पदीं त्यांच्या अनन्य होऊं । क्षमा मंतूची मागावया ॥५६॥ ऐसा विचार करुनी । सवें घेऊन चिंचवणी ।बंकटलालाच्या सदनीं । आला हकीकत सांगावया ॥५७॥ अहो शेटजी बंकटलाला । आज माझा घात झाला ।पाहा या चिंचवण्याला । आंत किडे पडले बहु ॥५८॥ माणसें उठलीं उपोषित । तेणें झाला श्राद्धघात ।हें ऐसें व्हावया कृत्य । माझा मीच कारण असे ॥५९॥ आज सकाळीं चिलिमीला । मीं नाहीं विस्तव दिला ।पोरें मागत असतां मला । समर्थांच्या चिलिमीस्तव ॥६०॥