Ganeshotsav in marathi

हिंदू धर्मात गणपतीला (गणेश) फार महत्त्वाचे स्थान आहे. सर्व प्रकारच्या शुभकार्यात सर्वप्रथम गणपतीचे पूजन केले जाते. शिव-पार्वतीचा पूत्र गणपतीला विद्येचे दैवत मानले जाते.

ज्या दिवशी शंकराने गणपतीला हत्तीचे तोंड लावून त्याला जिवंत केले त्या दिवशी गणेशोत्सव साजरा केला जातो. त्या दिवसाला गणेश चतुर्थी म्हटले जाते. त्यानंतर 11 दिवस चालणारा हा उत्सव अनंत चतुर्थीला गणपतीच्या विसर्जनानंतर संपतो.

महाराष्ट्र, गुजरात आंध्रप्रदेशात हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. भाद्रपद महिन्याच्या चौथ्या दिवशी (साधारणत ऑगस्ट, सप्टेंबर या काळात ) गणेश चतुर्थी येते. घराघरात गणपतीची लहान मूर्ती आणली जाते व 11 दिवस मोठ्या भक्तीभावाने तिची पूजा केली जाते.

या काळात रोज सकाळी व संध्याकाळी त्याच्यापुढे आरती म्हटली जाते. मोदकाचा प्रसाद दिला जातो. अकरा दिवसांनी म्हणजे अनंत चतुर्थीला मूर्तीचे नदीत किंवा तलावात विसर्जन केले जाते. 1892 साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी हा गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करायला सुरवात केली.

पारतंत्र्याचा काळ असल्याने लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात जागृती निर्माण व्हवी हा हेतु त्यामागे होता. सरदार खाजगीवाले यांनी सर्वात प्रथम गणेशोत्सव ग्वाल्हेरला साजरा केला. गणपत घोवडेकर, भाऊ वैद्य, भाऊ रंगारी यांनी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठपना करुन हा उत्सव साजरा केला.

हे पाहून टिळक यांनी पुण्यात केसरीवाड्‌यात सार्वजनिक स्वरुपात गणेशोत्सवाची सुरुवात केली. गणेश चतुर्थीला गणपतीची प्रतिष्ठापना केल्यानंतर काही लोक दीड दिवसांनी, काही पाच, सात किंवा अकराव्या दिवशी गणपतीचे विसर्जन करतात.

गणपती बसल्यनंतर पाच दिवसांनी गौरींचे आगमन होते. त्या दोन दिवस राहतात. सातव्या दिवशी त्यांचेही विसर्जन केले जाते. सार्वजनिक मंडळे या काळात आकर्षक देखावे उभारतात.

यात ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक देखावे असतात. अनंत चतुर्थीच्या दिवशी वाजत गाजत मिरवणूक काढून गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते.

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभः निर्विघ्नं कुरूमे देव सर्वकार्येषु सर्वदा”

हिंदु धर्मीयांची आराध्यदेवता श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करतांना आपल्याला पहायला मिळतात.

गणपती ही बुध्दीची देवता असुन प्रत्येक कार्यारंभी त्याचे पुजन प्रथम करण्याची प्रथा असल्याने प्रत्येक हिंदु हृदयात या गणेशाप्रती आदराची भावना विराजमान आहे.