Marathi mahine 12

मराठी महिनेचैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन.

भारतीय परंपरेप्रमाणे रात्रीचे तीन भाग करून, त्यांपैकी पहिले दोन भाग अलीकडील दिवसात घेतात व तिसरा भाग पुढच्या दिवसात घेतात. (म्हणजे रात्री 2 ते 2।। या वेळी वार बदलतो.)

Marathi Mahine हिंदू पंचांगानुसार एका वर्षामध्ये बारा महिने असतात. या बारा महिनांना बारामास असे म्हटले जाते. एका महिन्यातल्या एका दिवसाला तिथी असे म्हटले जाते. एक दिवस म्हणजे एक तिथी होय आणि एका दिवसामध्ये चोवीस तास असतात. पंचांगानुसार एका महिन्यामध्ये 30 दिवस असतात. आणि त्या महिन्याची गणना सूर्य आणि चंद्र यांच्या स्थितीनुसार होत असते.

म्हणजे चंद्राच्या कमी-अधिक होण्याच्या स्थितीवरून एका महिन्याचे दोन भागांमध्ये विभाजन केले जाते. एका भागा मध्ये पंधरा दिवस असतात त्यांना कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष असे म्हणतात.